अहमदनगर : बाबांची आयुष्याची मेहनत आगीत भस्मसात, शिल्पकार प्रमोद कांबळेंच्या मुलाची खंत

Continues below advertisement
दगडात जीव ओतणं सोपं नसतं.. कुंचल्यातून जिवंत माणसं किंवा रचना रेखाटणं अत्यंत कर्मकठीण काम.. निसर्ग म्हणा किंवा देव म्हणा त्याच्यानंतर ही किमया फक्त आणि फक्त एक कलाकार, शिल्पकार किंवा चित्रकारच करु शकतो. पण 20 वर्ष जीव एक करुन केलेलं काम आपल्या डोळ्यादेखत बेचिराख झालं तर..? हे एखादं दु:स्वप्नच. पण प्रमोद कांबळे यांच्याशी नियतीनं हासुद्धा खेळ खेळलाय. त्यामुळेच काल बेचिराख झालेला स्टुडिओ पाहताना आज प्रमोद एखाद्या लहानग्याप्रमाणं ढसाढसा रडले. हे दृश्यं बघून उपस्थितांच्याही काळजाला घरं पडली..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram