अहमदनगर : खासदार दिलीप गांधींसह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल

अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिलीप गांधी यांच्यासह त्यांचा नगरसेवक मुलगा सुवेंद्र गांधीवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करुन सीआयडी चौकशीचे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते.

हायकोर्टाच्या खंडपीठाने नगरच्या शोरुम मालकाच्या याचिकेवर आदेश दिले आहेत. या प्रकरणी फोर्ड शोरुमचे मालक भूषण बिहाणी यांनी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

दिलीप गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधी, पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्यावर अपहरण, खंडणी आणि कट रचल्याप्रकरणी भूषण बिहाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण बिहाणी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola