अहमदनगर: कुरिअर पार्सलचा स्फोट
Continues below advertisement
कुरिअर पार्सलचा स्फोट होऊन त्यात ३ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर शहरातल्या माळीवाडा भागात घडली आहे. इथल्या मारुती कुरिअर कार्यालयात कर्मचारी कुरिअर फोडायचं काम करत होते. मात्र त्यातील एक पार्सल फोडत असताना त्याचा अचानक स्फोट झाला. या पार्सलमध्ये असणाऱ्या स्पीकरच्या पाईपमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर होती. स्फोट झाल्यानंतर हे पाईपचे तुकडे संजय क्षीरसागर या कर्मचाऱ्याच्या हातात आणि पायात घुसले. सध्या या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Continues below advertisement