स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : लग्नाचा भपका टाळून नवदाम्पत्याकडून परीक्षार्थींना 3 लाखांची पुस्तकं
Continues below advertisement
हल्ली लग्नात संपत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन करण्याचा ट्रेंड आला आहे. डीजेच्या तालावर बेधुंद नाचत लग्नात पैसे उधळले जातात. मात्र अहमदनगरमध्ये नवदाम्पत्यानं डामडौल बाजूला ठेऊन नवा आदर्श घातला. लग्नाचा अनाठायी खर्च टाळून स्पर्धा परीक्षार्थींसाठी तब्बल तीन लाख रुपयांची पुस्तकं खरेदी केली आहेत.
Continues below advertisement