कोपर्डी निकाल : खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता, तरीही जिंकलो : निकम

Continues below advertisement
उज्ज्व निकम यांनी सांगितलं की, "खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता. हा खटला संपूर्णत: परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. हे परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सिद्ध करुन दाखवले. मनुष्य खोटं बोलू शकतो, परिस्थिती खोटं बोलू शकत नाही, याचा प्रत्यय खटल्यात आला. आरोपी क्रमांक एकचा रक्तग्रुप 'ओ' होता, तर मुलीचा रक्तग्रुप 'ए' होता. आरोपीच्या कपड्यांवर जे रक्त मिळलं, त्यावरील रक्तग्रुप 'ए' होता आणि आरोपी हे सिद्ध करु शकला नाही. "
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram