अहमदनगर : जामखेडमध्ये राजकीय बॅनर लावण्याच्या वादातून हत्या, पोलीस उपअधीक्षकांची माहिती
Continues below advertisement
अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक वर्षापूर्वी राजकीय बॅनर लावण्यावरुन झालेल्या वादातून या दोघांची हत्या करण्यात आली, अशी फिर्यात मृताच्या भावाने दिली आहे.
मृत योगेशचा भाऊ कृष्णा याने जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. चार ते पाच जणांनी कट रचला आणि योगेश आणि राकेश यांची दुचाकीस्वारांनी गोळीबार करुन हत्या केली, असा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, वैयक्तिक वादातून ही हत्या घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. राजकीय बॅनर लावण्यातून हत्या झाली असल्याचा आरोप करण्यात आला असला, तरी तशी कोणतीही नोंद पोलीस स्टेशनला करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी दिली.