अहमदनगर : छिंदम प्रकरणावरुन नगर भाजपमध्ये उभी फूट, खा. दिलीप गांधींच्या राजीनाम्याची मागणी
Continues below advertisement
शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा नगरमधील उपमहापौर श्रीपाद छिंदम याला नागरिकांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात दिलं. त्यानंतर त्याला आज कोर्टात हजर केलं असताना त्याला चौदा दिवसांची कोठडी सुनावण्यात आलीय. त्याचसोबत भाजपतूनही त्याची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणावरुन अहमदनगर भाजपमध्ये उभी फूट पडली. याच मुद्द्यवरुन पक्षातली अंतर्गत गटबाजी देखील उघड झालीये. खासदार दिलीप गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा किंवा पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करावी अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अभय़ आगरकर यांनी केलीय. तसंच गांधींनी आधी आत्मपरिक्षण करावं असा सल्लाही दिलाय. सगळ्यांचा विरोध असतानाही खासदार गांधींनी छिंदमला उपमहापौर केल्याचा आऱोपही त्यांनी केलाय.
Continues below advertisement