अहमदनगर : विहिंपच्या मिलिंद मोभरकर यांच्यावर शाईफेक
कोरेगाव-भीमातील ऐतिहासिक विजयस्तंभाबाबत फेसबुकवर वादग्रस्त लिखाण केल्याच्या कारणावरुन, विहिंपचे कार्यकर्ते मिलिंद मोभरकर यांच्यांवर शाईफेक करण्यात आली आहे. अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात ही शाईफेक करण्यात आली आहे. वादग्रस्त लिखाण केल्याबद्दल मोभरकर यांना सकाळी अटक झाली होती. याप्रकरणी मोभरकर यांना संध्याकाळी जामीन मिळाला.