अहमदनगर : शनीशिंगणापूर संस्थानवर सरकारचं विश्वस्त मंडळ
Continues below advertisement
भक्तांच्या साडेसातीचं विघ्न दूर करणारा,अशी शनीशिंगणापूरच्या शनी देवाची ख्याती आहे. मात्र आता हे देवस्थान राज्य सरकारने ताब्यात घेतलं आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे अगामी काळात शनी देवावर राजकारण्यांचा वरदहस्त राहणार आहे. देवस्थानच्या कारभारावर भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्याचबरोबर ग्रामसभेने ठराव करुन विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणीही केली होती. या प्रकरणी सरकारने समिती गठित केली होती. या समितीचा अहवालानुसार देवस्थान ताब्यात घेण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement