अहमदनगर : नीरव मोदीला शेतकऱ्यांकडून अद्दल, कर्जतमधल्या 125 एकर जमिनीवर ताबा
Continues below advertisement
देशाला हजारो कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या फरार नीरव मोदीला अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. कर्जत तालुक्यातील खंडाळा गावातील नीरव मोदीच्या 125 एकर जमिनीवर शेतकऱ्यांनी कब्जा केलाय. शेतकऱ्यांनी ही जमीन ट्रॅक्टरनं नांगरली असून उद्यापासून याठिकाणी शेती करणार आहेत. या घडीला या जमिनीवर अंमलबजावणी संचालनालयाचा ताबा आहे. तसंच इथं फायरस्टोन कंपनीचा उर्जा प्रकल्पदेखील आहे. इडीनं ही जमिन सील करूनही इथं उर्जा प्रकल्प सुरूच आहे.
मात्र ते झुगारत देशाला गंडवणाऱ्या नीरवची जमिन शेतकऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे.
मात्र ते झुगारत देशाला गंडवणाऱ्या नीरवची जमिन शेतकऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतली आहे.
Continues below advertisement