अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाबाबत सकारात्मक : मुख्यमंत्री
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर सरकार सकारात्मक असून योग्य वेळी निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि संघर्ष कृती समितीचे सदस्य यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे.
Continues below advertisement