स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : पोटनिवडणुकीच्या वादातून दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या
Continues below advertisement
केडगावमध्ये राजकीय वैमनस्यातून दोघांची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. गोळीबारात सेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांचा जागीच मृत्यू झाला. मारेकऱ्यांनी गोळीबार करुन कोयत्यानं ही वार केला. मृतदेह झाकले असून पोलिसांना हात लावू दिला गेला नाही.
सुवर्णनगर परिसरात भर चौकात सायंकाळी दोघांवर गोळ्या झाडल्या. संजय कोतकर आणि वसंत ठुबे सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. त्यावेळी दोघेजण गोळीबार करुन फरार झाले. या हत्याकांडानंतर जमावानं दगडफेक करुन वाहनांची मोडतोड करण्यात आली. यामुळे केडगावात तणावाचं वातावरण असून व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली आहे. पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे.