अहमदनगर : पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सावरगावात, भाविकांअभावी भगवानगडावर शुकशुकाट
यंदाचा भगवानगडावरचा दसरा मेळावा सावरगाव घाटावर होत असल्यानं भगवानगडावर यंदा शुकशुकाट पहायला मिळत आहे. भाविकांऐवजी आज भगवानगडावर पोलिसांचाच बंदोबस्त जास्त दिसून येत आहे. महंत नामदेवशास्त्री यांच्या विरोधामुळे यंदा पंकजा मुंडे यांनी गडाऐवजी भगवान बाबा यांचं जन्मस्थान असलेल्या सावरगाव घाट इथं दसरा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला.