Rahibai Popere | बीजमाता राहीबाई पोपेरेंना सरकारने दिलेल्या घराला गळती | अकोले, अहमदनगर | ABP Majha
शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन करणाऱ्या बीजमाता अर्थात राहीबाई पोपरे यांना राज्य सरकारनं दिलेल्या घराला पावसाने गळती लागली आहे. सरकारकडून राहीबाईंना गेल्या वर्षी नवीन घर सुपूर्द केलं मात्र यंदाच्या पावसाळ्यात त्या घराला गळती लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चिंतेची बाब म्हणजे सरकारनं दिलेल्या घराच्या भिंतीला ओल आल्यानं राहीबाईंची आयुष्यभराची जमापुंजी म्हणजेच त्यांनी जतन करून ठेवलेली बियाणं भिजण्याची भीती आहे. सरकारनं दिलेल्या घराच्या दुरवस्थेची एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझाच्या हाती लागली आहेत.