दिवसाढवळ्या मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लंपास | अहमदनगर | एबीपी माझा
संगमनेर तालक्यातीलु श्री क्षेत्र अकलापूर दत्त मंदिरातील दानपेटी दिवसाढवळ्या फोडून त्यामधील रक्कम चोरट्यांनी लंपास केली. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दोन चोरट्यांनी मोठ्या शिताफीने दानपेटी फोडत रोख रकमेवर डल्ला मारला. मंगळवारी (7 नोव्हेंबर) दुपारी अडीचच्या दरम्यान ही घटना घडली. मात्र चोरीचा प्रकार मंदिर प्रशासनाच्या उशिरा लक्षात आला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. त्यामधून चोरीचा प्रकार समोर आला. अकलापूर याठिकाणी श्रीदत्त महारांजाचे भव्य दिव्य असे मोठे मंदिर आहे. जागृत देवस्थान असल्याने हजारो भाविक दत्त महाराजांच्या दर्शनासाठी इथे येतात. हे मंदिर गावापासून दूर आहे. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास परिसरात कोणी नसल्याचा फायदा घेत, अज्ञातांनी मंदिरातील दानपेटी फोडली.