अहमदनगर : एबीपी न्यूजच्या नावे खंडणीचा प्रयत्न, तोतया पत्रकार अटकेत
Continues below advertisement
एबीपी न्यूजच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराला पोलिसांनी जेरबंद केलं . अजीज बाबू इनामदार असं या भामट्याचं नाव आहे.
या भामट्याने लॉरेन्स स्वामी या व्यावसायिकाकडं 25 लाखाची खंडणी मागितली होती. आरोपीकडून दहा हजारांच्या मुद्देमालासह एबीपी न्यूजच्या बनावट चॅनल आयडी आणि बूम जप्त करण्यात आला आहे.
तसंच एबीपी न्यूजच्या नावाची बॅग आणि एबीपी न्यूजचं बनावट ओळखपत्र जप्त केलं आहे. त्याचबरोबर दैनिकाचे दोन बनावट ओळखपत्र जप्त केले आहेत.
Continues below advertisement