अहमदनगर : संजय नहारांसोबत घातपाताचा प्रयत्न, नहारांच्या नावे पाठवलेल्या पार्सलचा नगरमध्ये स्फोट
संजय नहार यांना पाठवलेल्या कुरिअर बॉक्समध्ये एक चिठ्ठी आढळल्याची माहिती मिळते आहे. मला तुम्ही जम्मूहून आणले, शिकवले, पायावर उभे केले, मी आभारी आहे. माझ्या आवाजात ते रेकॉर्ड केले आहे. ते ऐका, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत असल्याचंही समजतंय. मात्र, अशा प्रकारची कुठली चिठ्ठी आढळल्याच्य़ा प्रकाराला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या जीवावर कोण उठलंय. असा प्रश्न आता पडू लागला आहे.