अहमदनगर : सापासोबत स्टंटबाजी जीवावर, दंशाने 28 वर्षीय तरुण मृत्यूमुखी
सापाबरोबरची स्टंटबाजी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडीतील तरुणाच्या जीवावर बेतली आहे. घरासमोर आढळून आलेल्या सापाला पकडण्याच्या स्टंटबाजीत सापाने दंश केल्याने 28 वर्षीय शिवाजी गेणबा लष्कर या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.