अहमदाबाद : विहिंपचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया बेशुद्ध अवस्थेत सापडले
बेपत्ता झालेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यालध्यक्ष प्रवीण तोगडियांचा पत्ता लागला आहे. अहमदाबादमध्ये बेशुद्ध अवस्थेत ते सापडले. तोगडिया यांच्यावर सध्या अहमदाबादमधील चंद्रमणी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांच्या ताब्यात असताना तोगडीया बेपत्ता झाले, असा खळबळजनक आरोप विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. तर आम्ही तोगडीयांना अटक केलीच नाही असा दावा राजस्थान पोलिसांचा दावा आहे.