SUPER EXCLUSIVE : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुलाखत

Continues below advertisement
सध्या देशाचंच नव्हे तर अवघ्या जगाचं लक्ष गुजरातच्या निवडणुकीकडे लागलं आहे. अर्थात नरेंद्र मोदींचं गुजरात. गेल्या तीन महिन्यांपासून गुजरातमध्ये प्रचाराचा धुरळा उडाला. अगदी मंदिर, मस्जिद, जातीचं राजकारण, पाटीदारांचं आरक्षण, दलितांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नांनी काहूर माजवलं आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान 9 तारखेला पार पडलं आणि दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 14 तारखेला होणार आहे. पण त्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना या निवडणुकीबद्दल, प्रचाराच्या पातळीबद्दल एबीपी न्यूज नेटवर्कला विशेष मुलाखत दिली. यावेळी राहुल गांधींनी गुजरातमध्ये काँग्रेसचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल असाही राहुल गांधींनी दावा केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram