अहमदाबाद : प्रवीण तोगडियांच्या सहकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

Continues below advertisement

विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया खरोखर घाबरले की ते सरकारला घाबरवत आहेत, अशी शंका आता निर्माण झाली आहे. कारण, बेपत्ता झाल्याच्या काऴात प्रवीण तोगडिया ज्या व्यक्तीकडे थांबले होते, त्या व्यक्तीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ''सरकारविरोधात रोष निर्माण करण्याची हीच एक संधी आहे''....असं ती व्यक्ती बोलत आहे.  घनश्याम कपुरिया असं या व्यक्तीचं नाव आहे.  बेपत्ता झाल्यापासून काल विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया माध्यमांसमोर आले. आणि आपल्या इन्काऊंटरचा कट रचला गेला होता., असा दावा करत त्यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर टीका केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram