अहमदनगर : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या छिंदमला जामीन मंजूर
Continues below advertisement
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला जामीन मंजूर झाल्याने त्याची आज (मंगळवार) नाशिक कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने छिंदमला सशर्त जामीन मंजूर केला आहे.
शिवाजी महाराजांच्या विरोधात अक्षेपार्ह वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा छिंदमवर दाखल आहे. या दोन्ही गुन्ह्यात शुक्रवारी त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता. अखेर नाशिक कारागृहातून आज दुपारी त्याची सुटका करण्यात आली. मात्र त्यानंतर तो अज्ञातस्थळी गेल्या असल्याची माहिती समजते आहे.
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमने जनक्षोभ उसळल्यावर व्हिडिओ प्रसारित करुन जनतेची माफी मागितली होती. मात्र, आता छिंदमनं ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली आहे. छिंदमनं मी निर्दोष असून राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं आपल्या जामीन अर्जात म्हटलं होतं. त्याचबरोबर, “मी घरातील एकमेव कर्ता पुरुष आहे. आई आजारी असून, दोन लहान मुले असल्यानं देखभालीसाठी जामीन मिळावा.” असंही म्हटलं होतं.