अहमदनगर : शिवसैनिकांचं दुहेरी हत्याकांड : आरोपी भानुदास खोतकर ताब्यात

Continues below advertisement
अहमदनगरमध्ये शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात आरोपी असलेल्या भानुदास कोतकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुण्याच्या येरवडा परिसरातून एसआयटीच्या पथकाने कोतकरला ताब्यात घेतलं. केडगाव पोटनिवडणूकीत निवडून आलेला काँग्रेसचा नगरसेवक विशाल कोतकर आणि भानुदास कोतकर हे काका-पुतणे आहेत. भानुदास कोतकर लॉटरी विक्रेता अशोक लांडे हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगतोय, सध्या तो वैद्यकीय जामीनावर बाहेर आहे. नगर महापालिकेच्या केडगाव पोटनिवडणुकीदरम्यान दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह अनेकांना याआधीच अटक झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram