अहमदनगर : कचराप्रश्न पेटला, सावेडीतील डेपोत कचरा टाकण्यास नागरिकांचा विरोध

औरंगाबादनंतर आता अहमदनगरमध्येही कचऱ्याच्या प्रश्न पेटताना दिसतोय. शहराचं मुख्य उपनगर असलेल्या सावेडी इथल्या कचरा डेपोत जाणाऱ्या गाड्या आज नगरसेवक आणि स्थानिकांनी आडवल्या. यामुळं तणाव निर्माण झाला होता. सध्या इथं शहरात सावेडी आणि बुरुडगाव या दोन ठिकाणी कचरा डेपो आहेत. मात्र बुरुडगावचा कचरा डेपो गेल्या २ महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळं सगळा कचरा सावेडीच्या कचरा डेपोत टाकला जात आहे. यामुळं सावेडीतल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
२ कोटी रुपये खर्चून प्रशासनानं बुरुडगावचा कचरा डेपो उभारला. कचऱ्यापासून इथं कंपोस्ट खत निर्मिती सुरु होती. मात्र गेल्या २ महिन्यापासून या प्रकल्पाला मुदतावाढ मिळालेली नाही. त्यामुळं सध्या हा डेपो बंद स्थितीत आहे.
हा प्रकल्प सुरु करावा अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola