अहमदनगरच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या अनिल बोरुडेंची वर्णी
Continues below advertisement
अहमदनगरच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज 11 वाजता अनिल बोरुडेंनी आपला अर्ज दाखल केला. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला अर्ज मागे घेतला. श्रीपाद छिंदम यानं शिवरायांबद्दल काढलेल्या अनुद्गारामुळे पश्चाताप म्हणून भाजप या निवडणुकीपासून दूर राहिली होती. त्यामुळे बोरुडेंना कुठल्याही विरोधाशिवाय उपमहापौरपदाची खुर्ची मिळाली आहे. श्रीपाद छिंदम यानं शिवरायांबद्दल अनुद्रार काढल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
Continues below advertisement