अहमदनगर : चौंडीमध्ये अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळ

Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाला गालबोट लागलं. अहिल्याबाई होळकर जयंती उत्सवात घोषणाबाजी, खुर्च्यांची फेकाफेक, तसंच मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगडफेक झाली. या दगडफेकीत संदीप पवार नावाच्या स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे  पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.

यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करुन चांगलाच चोप दिला. पोलिसांनी वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यावेळी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावर कार्यकर्त्यांना शांत करण्याची वेळ आली. मात्र त्यांनाही कार्यकर्त्यांनी दाद दिली नाही.

अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाला सुरुवात झाल्यावर पालकमंत्री राम शिंदे भाषण करत होते. यावेळी त्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं सांगत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram