अहमदनगर : 16 वर्षीय मुलीचं वडिलांसमोरच घरातून अपहरण

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यात एका १६ वर्षीय मुलीला वडिलांसमोरच चारचाकी वाहनात उचलुन नेल्याची घटना घडली. बारागाव नांदुर परिसरात मुलगी रात्री घरात झोपली असताना मध्यरात्री २ च्या सुमारास वाळू तस्कर किशोर माळीसह आलेल्या तिघांनी तिला पळवून नेलं. यावेळी मुलीच्या वडिलांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना धमकावत अंधाराचा फायदा घेऊन अपहरकर्त्यांनी पळ काढल्याचा आरोप होत आहे. किशोर माळी हा अट्टल गुन्हेगार आणि वाळू तस्कर असून त्याच्यावर राहुरी पोलिसात विविध गुन्हे दाखल आहेत. पण या घटनेमुळे मुली आपल्या घरात सुद्धा सुरक्षित नाही का असा प्रश्न उपस्थित होतो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola