अहमदाबाद : प्रवीण तोगडिया यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा
विश्व हिंदू परिषदेचे माजी नेते प्रविण तोगडिया यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून अहमदाबादमध्ये प्रविण तोगडिया उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आज शिवसेनेच्या एका शिष्टमंडळानं तोगडिया यांची भेट घेतली. मुंबईतून हे शिष्टमंडळ तोगडियांना भेटण्यासाठी गेलं होतं. दरम्यान, तीन दिवसांपासून उपोषण सुरु असल्यामुळे प्रवीण तोगडिया यांची प्रकृती बिघडत आहेत.