Saat Barachya Batmya : 7/12 : सात बाराच्या बातम्या : दोन एकर पपईतून लाखोंचा नफा ABP Majha

Continues below advertisement

Saat Barachya Batmya : 7/12 : सात बाराच्या बातम्या : दोन एकर पपईतून लाखोंचा नफा ABP Majha

जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव येथील नासिर शेख या शेतकऱ्याने दोन एकरात सेंद्रिय पद्धतीने पपई लागवड केलीय. यातून त्यांनी सात लाख रुपये उत्पन्न मिळवलंय. नासिर शेख यांच्या १५ एकरात पारंपरिक पिकांबरोबर वर्षभरापूर्वी प्रयोग म्हणून त्यांनी दोन हजार पपई रोपांची लागवड केली होती. दोन रोपातील अंतर ८ बाय ६ फूट ठेवल्याचं ते सांगतात. नोव्हेंबर महिन्यात तोडा सुरु झाला, आत्तापर्यंत साधारण ३२ ते ३५ टन पपईची त्यांनी विक्री केली आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत या पपईला १५ ते १८ रुपये प्रति किलो असा दर मिळाला.  मल्चिंगचा वापर त्यांनी केला आहे, त्यामुळे पाण्याची बचत झाल्याचं ते सांगतात. खत व्यवस्थापन, कीडरोग नियंत्रण, आंतरमशागत अशा नियोजनासाठी त्यांना साधारण एक लाख रुपये खर्च आला आहे. आत्तापर्यंत त्यांना ४ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे तर अजूनही झाडांवर ३५ टन माल शिल्लक आहे. यातून त्यांना तीन लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. योग्य मार्गदर्शन आणि घेतलेल्या मेहनतीमुळेच हे गोड फळ मिळाल्याचं शेख सांगतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram