आग्रा/ उत्तर प्रदेश : उंदरांनी पाया पोखरल्याने इमारत जमीनदोस्त, व्हिडीओ व्हायरल
Continues below advertisement
उंदरांनी इमारतीचा पाया पोखरल्यानं तीन मजली इमारत पत्त्य़ाच्या बंगल्यासारखी कोसळली. आग्रा शहरातमध्ये ही घटना घडली आहे. सुदैवाची गोष्ट अशी की, या इमारतीतल्या लोकांनी वेळीच ही इमारत खाली केल्यानं जीवितहानी टळली. इमारतीची अवस्था जर्जर झाल्यानं काही दिवसांपूर्वीच रहिवाशांनी ही इमारत सोडली होती. सुधीर वर्मा असं या इमारतीच्या मालकाचं नाव आहे. इमारत कोसळण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Continues below advertisement