आग्रा : ताजमहाल परिसरात माकडांची दहशत, पर्यटक हैराण
पर्यटकांना आता आग्य्रातील प्रसिद्ध ताजमहालला भेट देण्याचीही भीती वाटू लागली आहे. परिसरात फिरणाऱ्या मोकाट माकडांनी परदेशी पर्यटकांवर हल्ला चढवला. यामध्ये दोघं जण जखमी झाले आहेत. दिवसेंदिवस पर्यटकांवर माकडांचे हल्ले वाढत आहेत, खायला टाकले नाही तर ही माकडं हिंसक होतात. याबाबत स्थानिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र अद्यापही या माकडांचा कोणताही बंदोबस्त करण्यात आलेला नाही. यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.