अगरतळा : ईशान्येकडील भाजपच्या विजयाचे शिल्पकार सुनील देवधर यांच्याशी बातचीत

Continues below advertisement
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्रिपुरामध्ये भाजपने जवळजवळ एकहाती सत्ता मिळवल्याचं चित्र आहे. कारण येथे भाजपने 40 जागांवर आघाडी घेतली आहे. तर गेली 25 वर्ष सत्तेत असलेल्या सीपीएमला फक्त 19 जागांवर समाधान मानावं लागलं. पण सुनील देवधर यांनी डाव्यांचा बालेकिल्ल्याला सुरुंग लावून, तिथे सत्तापालट करण्याचे महत्त्वाचे काम या विधानसभा निवडणुकीत केले.

मोदी आणि अमित शाह यांनी सुनील देवधर यांना तीन वर्षापूर्वी त्रिपुरामध्ये पक्षाचे प्रभारी म्हणून नेमलं, त्यांच्या नियुक्तीवेळी त्रिपुरात पक्षाला कोणताही जनाधार नव्हता. गेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाच्या 50 पैकी 49 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. पण त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांनी तीन वर्ष त्रिपुराचा सर्व भाग पिंजून काढला. माणिक सरकार यांच्या खुर्चीला हादरवण्यासाठी ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवला.

त्यांनी सुरुवातीला त्रिपुरातील तरुणांना पक्षाशी जोडलं. शिवाय, वेगवेगळ्या वर्गातील नागरिकांच्या भेटी घेऊन, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram