Resignation in Congress | ज्योतिरादित्य शिंदेंकडून काँग्रेस सरचिटणीसपदाचा राजीनामा | ABP Majha
राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेमध्ये राजीनामासत्र सुरू झाला आहे. काँग्रेस सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. लोकसभेतील दारूण पराभव आणि राहुल गांधींचा राजीनाम्यानंतर शिंदे आणि देवरा यांनी आपलं पद सोडलं आहे.
देवरा यांनी राजीनामा सोपवतांना आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मुंबई कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी तीन सदस्यीय पॅनेलचा प्रस्तावही मांडला. मात्र मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी त्याला विरोध दर्शवलाय.