VIDEO | चौकीदार चोर है नंतर आती राहुल गांधींकडून 'आय लव्ह यू मोदी'चे बोल | एबीपी माझा
पुण्यात विद्यार्थ्यांशी आज राहुल गांधींनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मराठी अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का राहुल गांधींची मुलाखतही घेतली. राहुल गांधींनी आय लव्ह यू मोदी असं म्हणताच सभागृहात विद्यार्थ्यांनी मोदी मोदीच्या घोषणाही दिल्या. तर राजकारण्यांनी साठाव्या वर्षी निवृत्त व्हावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. लग्नाच्या प्रश्नावरही राहुल गांधींनी मजेशीर उत्तर दिलं. माझं लग्न कामाशी झालं आहे, असं म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उडालं.