आता 'डार्क नेट' गेमची धास्ती, गोवंडीतील मुलगा पहिली शिकार?
Continues below advertisement
ब्लू व्हेल गेमची डोकेदुखी अजूनही कायम असतानाच, आता ‘डार्क नेट’ हा नवा गेम नवी डोकेदुखी ठरत आहे.
ब्लू व्हेल गेमसारखाचा डार्क नेट गेमही तितकाच धोकादायक आहे. त्याची प्रचिती मुंबई जवळच्या गोवंडी परिसरात आल्याची धास्ती आहे. दहावीत शिकणारा 15 वर्षाचा मुलगा घर सोडून गेला आहे. त्याबाबतची तक्रार त्याच्या पालकांनी गोवंडी पोलिसात दिली आहे.
मात्र या मुलाने 29 ऑक्टोबरला घर सोडताना ‘मला शोधू नका मी मेलो असे समजा’ अशी चिट्ठी लिहून, घरातील 15 हजार रुपये घेऊन गेला.
आत्याकडे राहात असणाऱ्या या मुलाचे पालक मोठ्या मीडिया हाऊसमध्ये असल्याचं समजतं.
Continues below advertisement