अलाहाबाद : आरुषी हत्या प्रकरणी आई-वडील राजेश-नुपूर तलवार यांची सुटका
Continues below advertisement
नोएडामधील आरुषी-हेमराज हत्याकांड प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणातून तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सीबीआय कोर्टाने राजेश आणि नुपूर तलवार यांना दुहेरी हत्याकांडात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याच शिक्षेविरुद्ध त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली होती.
Continues below advertisement