Narali Purnima 2019 | नारळीपौर्णिमेनिमित्ताने आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
नारळीपौर्णिमेनिमित्ताने कोळी बांधवांनी आज वरळी कोळीवाड्यात समुद्राची पूजा केली. ज्या सागरातील मासेमारी करत ते आपला चरितार्थ चालवतात त्या समुद्राला त्यांनी या निमित्ताने वंदन केलं. यंदाच्या नारळीपौर्णिमेला सावट आहे ते कोस्टल रोडच्या विरोधाचं. काही कोळी बांधवांनी कोस्टल रोडला विरोध केल्याच्या बातम्या आल्या होत्या. तोच पवित्रा त्यांनी यावेळी कायम ठेवलाय. हा कोस्टल रोड झाल्यास मच्छिमारीसाठी समस्या निर्माण होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केलीय. दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही वरळी कोळीवाड्यात भेट दिली. आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभेच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा असल्याने त्यांची ही भेट चर्चेत आली.
Continues below advertisement