अभिनेत्री झीनत अमान यांची व्यावसायिकाविरोधात बलात्काराची तक्रार
Continues below advertisement
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री झीनत अमान यांनी मुंबईतील एका व्यावयायिकाविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. जुहू पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याला गुरुवारी रात्री अटकही करण्यात आली आहे.
झीनत अमान यांच्या तक्रारीनंतर क्राईम ब्रँचने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. काल गुरुवारी रात्री मोहम्मद सरफराज नावाच्या व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. त्याला आज कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.
68 वर्षीय अभिनेत्री झीनत अमान यांनी आरोपी व्यावसायिकाविरोधात महिन्याभरापूर्वीही पाठलाग करुन धमकावल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यावेळीही 30 जानेवारीला पोलिसांनी आरोपी व्यावसायिकाला अटक केली होती. आता मात्र त्यांनी बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. तसंच त्याच्याविरोधात 15 कोटी रुपयांच्या फसवणुकीचीही तक्रार झीनत अमान यांनी महिन्यापूर्वी दाखल केली आहे.