VIDEO | अभिनेते वैभव मांगले नाटकाच्या प्रयोगादरम्यान भोवळ, प्रकृती स्थिर | सांगली | एबीपी माझा

हरहुन्नरी मराठी अभिनेते वैभव मांगले यांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही उलटसुलट अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन खुद्द वैभव मांगले यांनी केलं आहे. सांगलीमध्ये नाटकाच्या प्रयोगादरम्यान ते चक्कर येऊन कोसळले होते.

सांगलीच्या भावे नाट्यगृहात 'अलबत्या-गलबत्या' नाटकाचा शो सुरु होता. या नाटकात ते चेटकीणीची मध्यवर्ती भूमिका साकारतात. प्रयोगादरम्यानच मांगले चक्कर येऊन कोसळल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं.

सांगलीत तापमानात जवळपास 42 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. नाट्यगृहात एसी नसल्यामुळे प्रचंड उकाडत होतं. चेटकीणीची रंगभूषा आणि वेशभूषा जड असल्यामुळे आपल्याला श्वासोच्छवासाचा त्रास झाला, असं मांगले म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola