VIDEO | कॉपीराईट उल्लंघन | WWE चॅम्पियन ब्रॉक लेसनरकडून रणवीरला कारवाईचा इशारा | ABP Majha
क्रिकेट विश्वचषकाचे साखळी सामने सुरु झाल्यानंतर भारतीय चाहत्यांमध्ये क्रिकेटज्वर वाढत चालला आहे. सर्वसामान्यांसोबत सेलिब्रिटीही नखं कुरतडत क्रिकेट सामन्यांचा आस्वाद घेत आहेत. फक्त मॅच पाहण्यावरच न थांबता, त्यानंतर ट्विटरवर फोटो आणि कमेंटही पोस्ट केल्या जातात. अशातच रणवीर सिंहने केलेली पोस्ट त्याला महागात पडू शकते. 1983 मधील पहिल्या क्रिकेट विश्वविजेत्या संघावर आधारित '83' या सिनेमाच्या निमित्ताने रणवीर सिंह भारत-पाक सामना पाहण्यासाठी इंग्लंडला गेला होता. त्यावेळी त्याने क्रिकेटपटू हार्दिक पंड्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केला. 'ईट. स्लीप. डॉमिनेट. रिपीट. द नेम इज हार्दिक. हार्दिक पंड्या. मा बॉय अनस्टॉपेबल' असं कॅप्शन रणवीरने दिलं.