पालघर : वारली चित्रकला जगभरात पोहोचवणारे पद्मश्री जिव्या मशे यांचं निधन
Continues below advertisement
लाखो घरांतील ड्रॉईंग रुमच्या भिंती ज्या वारली चित्रसंस्कृतीने सजल्या त्या चित्रकलेचे जनक जिव्या सोमा मशे यांच पहाटे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड़ येथील निवस्थानी अखेरचा श्वास घेतला. मशे हे पद्मश्रीने सन्मानित होते.
ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुदापार पोहोचविण्यात मशे यांचा सिंहाचा वाटा होता. डहाणू तालुक्यात गंजाड गावातल्या कलमी या आदिवासी पाड्यात १३ मार्च, १९३१ रोजी जिव्या सोमा मशे यांचा जन्म झाला. रुढी-परंपरांचा पगडा असलेल्या आणि प्रचंड मागासलेल्या आदिवासी समाजात ते वाढले. मात्र, त्याच आदिवासींच्या वारली परंपरेने मशे यांचे आयुष्य पालटले. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यावरील बायका लग्नसमारंभात आपल्या घराच्या भिंतींवर वारली चित्रं काढायच्या.
Continues below advertisement