VIDEO | हेल्मेटसक्तीने चार महिन्यात अपघाती मृत्यूचं प्रमाण घटलं | पुणे | एबीपी माझा
हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या पुणेकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. हेल्मेट सक्ती आणि वाहतुकीच्या कडक नियमांमुळे पुण्यात अपघातातील मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. हेल्मेट सक्तीनंतर पुण्यात गेल्यावर्षीपेक्षा 23 जणांचे अपघाती मृत्यू कमी करण्यात वाहतूक पोलिसांना यश आलं आहे. पुण्यातील वाहतुकीत बेशिस्तपणा असताना तेथे हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त डॉ. के वेंकटेशम यांनी घेतला होता. मात्र सर्वच स्तरातून त्यांच्या या निर्णयाला विरोध झाला. अनेक आंदोलने उभी राहिली. हेल्मेट सक्ती रद्द करण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यात आला. मात्र काही झालं तरी ऐकायचं नाही आणि लोकांच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा काम करायचं अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतली.