Junnar Accident | जुन्नर-कल्याण महामार्गावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन वृद्ध महिलांना वाहनाने चिरडलं | एबीपी माझा
Continues below advertisement
जुन्नर-कल्याण महामार्गावर उदापूरजवळ मॉर्निग वॉकला निघालेल्या तीन वृद्ध महिलांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे साडे पाच वाजता जुन्नर तालुक्यातील उदापूरजवळ ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला आहे. मीराबाई ढमाले, कमलाबाई ढमाले आणि सगुणाबाई गायकर अशी या वृद्ध महिलांची नावं आहे.
Continues below advertisement