कोंढाणे धरण घोटाळ्याप्रकरणी ठाणे कोर्टात 3 हजार पानी चार्जशीट दाखल, तटकरेंचं नाव नाही
कोंढाणे धरण घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत विभागानं आरोपपत्र दाखल केलं आहे. तीन हजार पानाचं हे आरोपपत्र लाचलुचपत विभागानं ठाणे सत्र न्यायालयात दाखल केलं आहे. यात तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांचं नाव असलं तरी त्यांचा आरोपी म्हणून उल्लेख नाही. या घोटाळ्यात तटकरेंचा सहभाग कसा होता? याचा तपास अद्यापही एसीबी करत आहे. आज दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये तत्कालीन अधिकाऱ्यांची नावं आहेत.