मुंबई : आमदार अमित साटम यांना दिलासा, ऑडिओ क्लीपप्रकरणी अभियंत्याने आरोप फेटाळले
आमदार अमित साटम यांना शिवीगाळ करणाऱ्या ऑडिओ क्लिपप्रकरणी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण ज्या क्लिपमध्ये साटम यांनी पालिकेचे कनिष्ठ अभियंते जितेंद्र राठोड यांना शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय, त्यांनी हे आरोप फेटाळलेत. माझं साटम यांच्यासोबत कोणतंही संभाषण झाल्याचं मला आठवतच नसल्याचं पत्र राठोड यांनी लिहिलंय.