मध्य प्रदेश-छत्तीसगडमध्ये कमळ, राजस्थानात हाताला साथ | एबीपी न्यूज सर्व्हे | एबीपी माझा
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन मोठ्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या अंतिम ओपिनिअन पोलमध्ये भाजपाला दोन राज्यांमध्ये सत्ता टिकवता येण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. तर काँग्रेसच्या हाताला एक राज्य साथ देण्याची शक्यता आहे. 'एबीपी न्यूज' आणि लोकनीती सीएसडीएसने केलेल्या सर्वेक्षणात या शक्यता समोर आल्या आहेत.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलणार तर राजस्थान मात्र दर पाच वर्षांनी सत्तांतरांची परंपरा राखत काँग्रेसकडे जाणार आहे, अशी चिन्हं ओपिनिअन पोलमधून दिसत आहेत.