Tiware Dam Tragedy | तिवरे धरण फुटीप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पथकाची स्थापना | ABP Majha

Continues below advertisement
मुसळधार पावसामुळे मंगळवारी चिपळूणमधील तिवरे धरण फुटले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर 4 जण अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जलसंपदा विभागाने सखोल चौकशीसाठी पथक स्थापन केलं आहे. तिवरे धरण फुटल्याने झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीची उच्चस्तरीय सखोल चौकशी व्हावी यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील या पथकाला दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram