गंगापूरचं पाणी वाया, मुळा धरणातलं पाणी जायकवाडीत दाखल | ग्राऊंड रिपोर्ट | एबीपी माझा
मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी जायकवाडी धरणात नगर, नाशकातल्या धरणांमधून पाणी सोडलं गेलंय. तमुळा धरणातून सोडलेलं पाणी आज जायकवाडी धरणात पोहोचलंय. काल सकाळी ९ वाजता मुळा धरणाच्या ११ दरवाजांमधून जायकवाडीला पाणी सोडण्यात आलं... ((सुरुवातीला ६ हजार क्युसेकनं सोडलेलं पाणी रात्रीनंतर १२ हजार क्युसेक इतक्या वेगानं पाणी जायकवाडीत सोडण्यात आलं..)) तर, दुसरीकडे गंगापूर धरणातून काल जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर अचानक पाण्याचा विसर्ग थांबवण्याचा आदेश जलसंपदा विभागानं दिला..त्यामुळं काल संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग अचानक बंद करण्यात आला..जलसंपदा विभागाच्या या नियोजनशून्यतेमुळं १ लाख ७० हजार टँकर पाणी वाया गेलं..