VIDEO | एबीपी माझाचे प्रतिनिधी नितीन भालेराव यांच्याकडून पर्रिकरांच्या आठवणींना उजाळा | एबीपी माझा

साधा सभ्य आणि सच्चा राजकारणी, माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. गोव्यातील मिरामार किनाऱ्यावर लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसागर लोटला होता. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.
मनोहर पर्रिकरांच्या निधनामुळं देशानं नेमकं काय गमावलंय हे शब्दात वर्णन करण्यापलिकडे आहे... गोव्यानं त्यांचा लाडका मुख्यमंत्री आणि घराघरातला भाई गमावलाय... देशानं अनेक महत्त्वाचे निर्णय घेणारा संरक्षण मंत्री गमावलाय.. ज्यांच्याकडे आदर्श राजकीय नेता म्हणून बघावं असं व्यक्तीमत्व राष्ट्रानं गमावलंय...स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरल्यानं मनोहर पर्रिकरांचं काल पणजीमध्ये राहत्या घरी निधन झाल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola