माझा विशेष : सुभाष देशमुखांचा बंगला कधी पाडणार? राजीनामा कधी घेणार?

Continues below advertisement
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात महापालिकेच्या आरक्षित जागेवर आलिशान बंगला बांधल्याचा अहवाल आलाय.
त्यानंतर सुभाष देशमुखांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे हे सगळं प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलंय. ज्या प्रमाणं भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसेंचा राजीनामा स्वीकारला. त्याप्रमाणं आता सुभाष देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार का हा प्रश्न आहे.
सोलापूरमधील बंगला बेकायदेशीर असल्याचा स्पष्ट अहवाल पालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिलाय. एखाद्या सामान्य नागरीकानं हे केलं असता कारवाई अगदी तत्पर झाली असती मग सर्वसामान्यांचा न्याय देशमुखांना कधी लावणार...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram